सुप्रिया सुळेंच्या दौऱ्यादरम्यान झळकले मंत्री अनिल पाटलांच्या विकासाचे बॅनर…

अमळनेर : गेल्या 12 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने शरद पवार यांनी ABP माझावर केलेल्या वक्तव्याचे बॅनर लावत अमळनेर शहरात जणू बॅनर वॉर केले होते. शरद पवार यांनी म्हटले होते की, मंत्री अनिल पाटील पुढील विधानसभेत दिसणार नाहीत.
मात्र आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्या दरम्यान अनिल पाटील यांच्या समर्थकांनी आता मागील बॅनर वॉरचा बदला घेतला असल्याचे दिसते. कारण अमळनेरच्या चौका-चौकात मंत्री अनिल पाटील यांनी केलेल्या विकास कामांचे बॅनर लावले आहेत. यात मंत्री अनिल पाटील यांनी केलेल्या सर्व कामांचा उल्लेख करण्यात आला आहे. जेथून सुप्रिया सुळे यांचा येण्याचा मार्ग आहे, तिकडेच ही बॅनर लावण्यात आली आहेत. काही बॅनर्स वर मंत्री पाटील यांचे फोटो असून काही बॅनर्स वर कोणाचेही नाव नाही.