पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते झाला गौरव…

अमळनेर : जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनाचे अवचित्य साधून जिल्ह्यातील महसुल विभागात उत्कृष्ठ कामगिरी करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला होता. यात अमळनेर उपविभागीय कार्यालयातुन अमळनेर तालुक्यातील पिळोदे गावातील पोलीस पाटील. लक्ष्मी जगदीश शिंदे यांना उत्कृष्ठ पोलीस पाटील पुरस्कार देऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जळगाव जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते उत्कृष्ठ पोलीस पाटील हा पुरस्कार देऊन गौरविण्यात करण्यात आले. दरम्यान या पुरस्काराने सर्व स्तरावरून शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
