शिक्षण क्षेत्रातील आणखी एक प्रेरणादायी यश!

प्रा. कृष्णा संदानशिव पीएचडी

 

 

अमळनेर : जिद्द, मेहनत आणि अभ्यासातील सातत्य यांच्या जोरावर प्रा. कृष्णा रोहिदास संदानशिव यांनी इंग्रजी विषयात पीएच.डी. पदवी संपादन करून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविले आहे.

त्यांच्या संशोधनाचा विषय “A Comparative Study of the Use of Magical Realism in Select Novels of Ben Okri and Salman Rushdie” असा असून जागतिक साहित्यविश्वातील दोन नामवंत लेखकांच्या साहित्याचा त्यांनी सखोल अभ्यास केला आहे.

या संशोधन कार्यासाठी त्यांना प्रा. डॉ. ज्योती राणे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण करून त्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली.
फैजपूर येथील निवृत्त प्राध्यापक बी. ए. संदानशिव यांचे पुतणे असलेले प्रा. कृष्णा संदानशिव सध्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इंग्रजी विभागात अध्यापनाचे कार्य करीत आहेत.

ग्रामीण भागातून उच्च शिक्षण क्षेत्रात यशाचे शिखर गाठणाऱ्या प्रा. कृष्णा संदानशिव यांचे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 भिम गर्जना 24 न्यूज परिवारातर्फे प्रा. कृष्णा रोहिदास संदानशिव यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 

– टीम भिम गर्जना 24 न्यूज
सत्य | समता | न्याय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!