मंत्री अनिल पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी आणि माजी आमदार साहेबराव यांची सेटलमेंट…

ही तीनही लोकं जनतेची दिशाभूल करताय ?

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे श्याम पाटील यांनी केला पत्रकार परिषदेत घणाघाती आरोप

अमळनेर : तालुक्यातील प्रमुख राजकिय लोक जनतेच्या भावनेशी खेळ – खेळत असून मंत्री अनिल पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार साहेबराव पाटील यांची सेटलमेंट झाली आहे. म्हणूनच शिरीष चौधरी यांनी नगर परिषद निवडणूकी वेळी झालेल्या गुन्ह्यात साक्ष फिरवत माघार घेतली आहे. अशीच अनेक वेळी माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार साहेबराव पाटील व मंत्री अनिल पाटील यांच्यात माघार घेतली गेली आहे. अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक श्याम पाटील पत्रकार परिषदेत केली आहे.

अनिल पाटील हे अत्यंत निकृष्ठ कामे तसेच इतर चुकीची कामे करीत असून लोकांवर दबाव टाकत आहेत ह्या सर्व गोष्टी असूनही माजी आमदार शिरीष चौधरी व माजी आमदार साहेबराव पाटील यांनी एकाही वेळेस विरोध केला नाही किंवा त्यांच्या विरोधात आंदोलनं केलेले नाहीत. तर 2019 नंतर कोणतीच एकही निवडणूक पाहिजे त्या ताकतीने लढले नाहीत. म्हणजेच यांची तिघांची सेटलमेंट झालेली आहे की काय अशी शंका उपस्थित होते हे सर्व लोक त्यांच्या कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप श्याम पाटील यांनी केला आहे. यांसह अनेक विषयांवर श्याम पाटील यांनी मंत्री अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यावर टीका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!