दोन दिवसात तीन बंटी-बबलींना व कॅफे चालकांना पोलिसांकडून समज

अमळनेर : शहरात काही ठिकाणी आईस्क्रीम कॅफेंमध्ये बंटी-बबलींचे म्हणजेच प्रेमी युगलांचे अश्लील चाळे सुरू होते, आजूबाजूच्या लोकांकडून या बाबत अनेक वेळेस पोलिसांकडे तक्रारी देखील होत होत्या. पोलीसांनी वेळोवेळी आईस्क्रीम कॅफे चालकांना या बाबत सूचना देऊनही त्यांनी हे बंद केले नाही, म्हणून परत असे प्रकार होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने पोलीसांनी संबंधित कॅफे गाठत बुधवारी ३ तर गुरुवारी १ अशा तीन प्रेमी युगलांना पोलीस ठाण्यात नेऊन समज देण्यात आली. तर नंतर संबंधित कॅफे चालकांना देखील समज देण्यात आली असल्याचे समजते.
