रिक्षात टाकून नेले गावाबाहेर; पोलिसात गुन्हा दाखल

अमळनेर : शहरात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना काल उघडकीस आली. या नाराधमाने त्या मुलीस रिक्षात टाकून गावाबाहेर घेऊन गेला व तेथे तिच्यावर बलात्कार केला. या बाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक देखील करण्यात आली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, धनदाई महाविद्यालयात १२ वी वर्गात शिक्षण घेणारी एक अल्पवयीन मुलगी तिच्या लहान बहिणीला त्याच शाळेत सोडण्यासाठी मंगळवारी सकाळी गेली होती. बहिणीला सोडून परत येतांना ढेकू रोडवर मागून दिनेश रमेश भिल रा. शांताबाई नगर हा आला आणि मुलीच्या तोंडावर हात दाबला. समोरून येणाऱ्या रिक्षावाल्याला त्याने सांगितले की आम्हाला पिंपळे रोडवरील आयटीआयला सोड. रिक्षावाल्याने तेथे सोडल्यावर आरोपी नराधमाने मुलीला बळजबरीने बाजूला असलेल्या बंद शाळेच्या गच्चीवर नेत तिच्यावर बलात्कार केला. पीडित त्याठिकाणी ओरडत होती परंतु तेथे कोणीच नव्हते. त्यावेळी त्याने मुलीला तू माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला आणि तुझ्या घरच्यांना जीवे मारून टाकेल अशी धमकी दिली, तर यावेळी झालेल्या झटापटीत पीडित मुलीचे कपडे देखील फाटले होते. त्यानंतर तो मुलीला एकटा सोडून गेला, त्यानंतर तेथून मुलगी घाबरून पळत होती. तेव्हा तिला रस्त्यात तिचे आई – वडील भेटले त्यांना हकीगत सांगितल्यावर आईसोबत अमळनेर पोलीस ठाण्यात जाऊन पीडितेने फिर्याद दिली आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार अमळनेर पोलीस ठाण्यात आरोपी दिनेश भिल्ल विरुद्ध पोक्सो व बलात्काराच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल हे करीत आहेत.
