संविधान मूल्यांच्या प्रचारासाठी कार्यरत आशीष सपकाळे यांना ‘महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026’

सामाजिक व जनजागृती क्षेत्रातील योगदानाची राज्यस्तरावर दखल

जळगाव  : सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या क्षेत्रात सातत्याने कार्य करणारे जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आशीष उत्तमराव सपकाळे यांना “राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026” प्रदान करून गौरविण्यात आले.

संविधान अमृत महोत्सवानिमित्त तेजस सेवा प्रतिष्ठान, संगमनेर (जि. अहमदनगर) यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
संविधानिक मूल्यांचा प्रचार-प्रसार, सामाजिक जनजागृती, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने केलेले कार्य तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांमधील योगदानाची दखल घेऊन आशीष सपकाळे यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर आशीष सपकाळे यांनी हा सन्मान जळगाव जिल्ह्यातील नागरिक, सहकारी कार्यकर्ते आणि समाजपरिवर्तनासाठी कार्य करणाऱ्या सर्व घटकांना समर्पित असल्याची भावना व्यक्त केली. समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांसाठी भविष्यातही अधिक जोमाने कार्य करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भिम गर्जना 24 चे मत

संविधानिक मूल्ये, सामाजिक समता आणि जनजागृती यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव होणे ही समाजासाठी प्रेरणादायी बाब आहे. अशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून समाजात जागरूकता निर्माण होऊन लोकशाही मूल्ये अधिक मजबूत होण्यास मदत होते.
आशीष सपकाळे यांच्या या यशाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!